स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त केंद्र शासनाच्यावतीने "आजादी का अमृत महोत्सव" हा उपक्रम सर्व देशभर राबविण्यात येत आहे. हा उपक्रम राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिनांक १२ मार्च, २०२१ पासून ते १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत राबविण्यात येणार आहे.  "आजादी का अमृत महोत्सव" या उपक्राचे महाराष्ट्रात दिनांक १२ मार्च २०२१ रोजी  मां. मुख्यमंत्री, आणि मा. राज्यपाल महोदयांच्या उपस्थितीत मुंबई येथे उदघाटन करण्यात आले.

"आजादी का अमृत महोत्सव" या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमास सर्व स्तरातून सुरुवात करण्यात आलेली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन दिनांक १२ मार्च २०२१ रोजी मुंबईसह पूणे व वर्धा येथे जिल्हाधिकारी व सन्मानिय लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीत करण्यात आले. केंद्र शासनाने या उपक्रमाच्या यशस्वी अमंलबजावणी करण्याकरिता सर्व क्षेत्रातील सन्मानिय व्यक्तिचे मार्गशदर्शन होण्यासाठी विविध समित्यांचे गठण केले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात दिनांक दि.१३ आक्टो २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार धोरण समिती, कोअर समिती व अमंलबजावणी समितीचे गठण करण्यात आलेले आहे.

"आजादी का अमृत महोत्सव" या उपक्रमांतर्गत राज्यात स्वातंत्र्य संग्रामाशी निगडीत आयकॉनिक प्रकल्प, ऐतिहासिक वास्तुचे संवर्धन, हुतात्मा स्मारक, स्वातंत्र्य संग्रामातील अनाम वीरांचा इतिहास, भारतीय स्वातंत्र्यात महिलांचे योगदान, आदीवासींचा लढा यासारख्या स्फुर्तीदायक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. "आजादी का अमृत महोत्सव" हा उपक्रम जनसामान्याचा होण्यासाठी राज्य शासनाने या उपक्रमाकरिता विशेष लोगोचे अनावरण केले आहे, तसेच या उपक्रमात जनमाणसाचा सहभाग होण्याकरिता विशेष गीत तयार करण्यात आलेले आहे. या उपक्रमांतर्गत सर्व क्षेत्रात विविध कार्यकमाचे आयोजन, नविन प्रकल्पाचे  विमोचन  करण्यात येत आहे. "आजादी का अमृत महोत्सव" या उपक्रमाची  यशस्वी अमंलबजावणी होण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग - महाराष्ट्र राज्य सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे.

44137972

Visitors

516885

Participation in Competitions

20834

Events Published

Freedom Struggle

Commemorating milestones in history, unsung heroes etc.

Ideas@75

Celebrating ideas and ideals that have shaped India

Resolve@75

Reinforcing commitments to specific goals and targets

Actions@75

Highlighting steps being taken to implement policies and actualize commitments

Achievements@75

Showcasing evolution and progress across different sectors

Five Themes of Swatantryacha Amrit Mahotsav

Special Shows

Quotes

Video Gallery View All